• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, July 27, 2026
Malshiraslive
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • माळशिरस शहर
  • सोलापुर जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • राजकारण
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • माळशिरस शहर
  • सोलापुर जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • राजकारण
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Malshiraslive
No Result
View All Result

माणुसकीचे दर्शन: माजी आमदार रामभाऊ सातपुते ठरले ‘आरोग्यदूत’;

 त्रासलेल्या मिथुन काळेंना मिळाली मोफत शस्त्रक्रिया अन् नवे आयुष्य!

Admin Admin by Admin Admin
July 14, 2026
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
माणुसकीचे दर्शन: माजी आमदार रामभाऊ सातपुते ठरले ‘आरोग्यदूत’;
0
SHARES
70
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

माळशिरस लाईव्ह : आर्थिक परिस्थिती अभावी गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या गरीब आणि गरजू रुग्णांसाठी माजी आमदार रामभाऊ सातपुते हे खऱ्या अर्थाने ‘आरोग्यदूत’ ठरत आहेत. माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील रहिवासी मिथुन सुभाष काळे यांच्यावर मुंबईतील नामांकित रुग्णालयात अंदाजे तीन लाख रुपये खर्चाची खुब्याची (Hip) शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत आणि यशस्वीरित्या करण्यात आली आहे. या मदतीमुळे मिथुन काळे यांना वेदनामय जीवनातून मुक्ताता मिळून नव्या आयुष्याची सुरुवात करता आली आहे.पिलीव येथील रहिवासी मिथुन सुभाष काळे हे गेल्या अनेक वर्षांपासून खुब्याच्या गंभीर आजाराने त्रस्त होते. डॉक्टरांनी त्यांना तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, या उपचारासाठी लागणारा सुमारे ३ लाख रुपयांचा खर्च उभा करणे त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे शक्य नव्हते. त्यामुळे उपचाराअभावी त्यांना तीव्र वेदना सहन करत दिवस काढावे लागत होते.

मा.आ.रामभाऊ सातपुतेंचा तातडीने मदतीचा हात

मिथुन काळे यांच्या या बिकट परिस्थितीची माहिती मिळताच माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी तातडीने मदतीचा हात पुढे केला. त्यांनी आपल्या विशेष संपर्कातून मुंबईतील नामांकित रुग्णालयात त्यांच्या मोफत उपचाराची व्यवस्था केली. नुकतीच मिथुन काळे यांच्यावर खुब्याची अत्यंत जटिल (गुंतागुंतीची) शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली.

अनेक वर्षांच्या त्रासातून झाली सुटका

शस्त्रक्रियेनंतर मिथुन काळे यांची प्रकृती आता उत्तम असून, अनेक वर्षांपासून होत असलेल्या शारीरिक त्रासातून त्यांची सुटका झाली आहे. आर्थिक अडचणीच्या काळात देवदूतासारखे धावून येत मदत केल्याबद्दल काळे कुटुंबीयांनी माजी आमदार रामभाऊ सातपुते यांचे मनापासून आभार मानले आहेत.

संवेदनशील कार्याचे तालुक्यातून कौतुक

  • गरीब, कष्टकरी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सातत्याने मदतीला धावून जाणाऱ्या रामभाऊ सातपुते यांच्या या संवेदनशील कार्याचे पिलीव परिसरासह संपूर्ण माळशिरस तालुक्यातून कौतुक होत आहे.
  • पैशांअभावी कोणत्याही गरजू रुग्णाचा उपचार थांबू नये, या उद्देशाने राबविले जाणारे त्यांचे हे कार्य समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे.
Previous Post

डोंगररावरील सुळकीई मंदिरात चोरी

Next Post

‘पाटोदा’ पॅटर्नचा अभ्यास करणार माळशिरस नगर विकास आघाडी;

Next Post
‘पाटोदा’ पॅटर्नचा अभ्यास करणार माळशिरस नगर विकास आघाडी;

'पाटोदा' पॅटर्नचा अभ्यास करणार माळशिरस नगर विकास आघाडी;

ताज्या बातम्या

आषाढी वारीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी १५० कोटींचा खर्च

आषाढी वारीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी १५० कोटींचा खर्च

July 27, 2026
जनकल्याण वाणी अमृत प्रवचनमालेत ‘भक्ती की शक्ती’ विषयावर आचार्य श्री सुविधी सागर महाराजांचे मार्गदर्शन; दर रविवारी सकाळी ८ वाजता प्रवचन

जनकल्याण वाणी अमृत प्रवचनमालेत ‘भक्ती की शक्ती’ विषयावर आचार्य श्री सुविधी सागर महाराजांचे मार्गदर्शन; दर रविवारी सकाळी ८ वाजता प्रवचन

July 27, 2026
आषाढी वारीच्या प्रेरणेतून ५१ कि.मी. धाव; गणेश शिंदे यांचा निरोगी जीवनशैलीचा समाजाला संदेश

आषाढी वारीच्या प्रेरणेतून ५१ कि.मी. धाव; गणेश शिंदे यांचा निरोगी जीवनशैलीचा समाजाला संदेश

July 26, 2026
रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भक्तिमय वातावरणात ‘बालदिंडी सोहळा’ उत्साहात संपन्न!

रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भक्तिमय वातावरणात ‘बालदिंडी सोहळा’ उत्साहात संपन्न!

July 25, 2026
वेळापूरजवळ अपघात ; सात वारकरी जखमी

वेळापूरजवळ अपघात ; सात वारकरी जखमी

July 22, 2026
Malshiraslive

© 2024 Malshiras Live - Design By Umesh Tonpe 8007773888.

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • माळशिरस शहर
  • सोलापुर जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • राजकारण
    • शेती – शेतकरी

© 2024 Malshiras Live - Design By Umesh Tonpe 8007773888.

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group