माळशिरस लाईव्ह – आषाढी वारीसाठी पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्राम विकास विभागाने तब्बल १५० कोटी रुपयांचा निधी खर्च केला आहे.
या निधीतून निवारा, स्वच्छता, पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, फिरते शौचालय, महिला स्नानगृहे, जर्मन हॅंगर आणि मोबाईल चार्जिंग केंद्रांसह विविध मूलभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत.
📊 वारीसाठी निधीच्या वापराचा मुख्य तक्ता (खर्च रक्कम)
| कामाची बाब / सुविधा | खर्च रक्कम |
| जर्मन हॅंगर (मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र) | ८.०० कोटी, |
| वॉटरप्रूफ मंडप | ३.५० कोटी |
| प्रचार व प्रसिद्धी | ५.०० कोटी |
| वारकऱ्यांना सेवा व सुविधा | ४.०० कोटी |
| पाणी टँकर पुरवठा | ३.०० कोटी |
| औषधे खरेदी व वैद्यकीय सुविधा | १०.०० कोटी |
| महिला स्नानगृहे | १.५० कोटी |
| फिरते शौचालय | २०.०० कोटी |
| सफाई सेवा | १.०० कोटी |
| मोबाईल चार्जिंग व्हॅन | ५० लाख |
| मेडिसिन ऑन व्हील | ५० लाख |
| ग्रामपंचायतींना अनुदान | ४.५० कोटी |
| जिल्हा परिषदेकडून खर्च | ६१.५० कोटी |
| एकूण राज्यस्तरीय खर्च | १५० कोटी |
सोलापूर जिल्ह्यासाठी ६१.५० कोटींची तरतूद: वारी व्यवस्थापनासाठी सोलापूर जिल्हा परिषदेमार्फत ६१.५० कोटींचा निधी विविध कामांवर खर्च करण्यात आला.
- भाविक संख्या: गेल्या २४ तासांत दर्शन रांगेतून १८ लाखांहून अधिक भाविकांनी श्रीविठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले, तर वारीत ३० लाखांहून अधिक वारकरी सहभागी झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
- “वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा आत्मा आहे. भाविक-केंद्रित व्यवस्थापनाला प्राधान्य देण्यात आले आहे,” असे सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी सांगितले.





