• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, July 27, 2026
Malshiraslive
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • माळशिरस शहर
  • सोलापुर जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • राजकारण
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • माळशिरस शहर
  • सोलापुर जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • राजकारण
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Malshiraslive
No Result
View All Result

डोंगररावरील सुळकीई मंदिरात चोरी

 चोरांनी लांबवले देवाचे चांदीचे मुकुट

Admin Admin by Admin Admin
July 14, 2026
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
डोंगररावरील सुळकीई मंदिरात चोरी
0
SHARES
400
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

माळशिरस लाईव्ह – माळशिरस तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून आता चोरांनी थेट देवाच्या मंदिरांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. माळशिरस तालुक्यातील गारवाड येथील डोंगररावरील प्रसिद्ध ‘सुळकी तुकाई मंदिराचे’ कुलूप तोडून अज्ञात चोरांनी चांदीचे मुकुट चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

१९ हजारांचे ३ चांदीचे मुकुट लंपास

मिळालेल्या माहितीनुसार, नामदेव बोधला मगर (वय ७२, रा. गारवाड) यांनी या प्रकरणी माळशिरस पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही चोरी ९ जुलै ते १० जुलै २०२६ रोजी दरम्यान झाली.चोरांनी मंदिराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि मंदिरातील एकूण १९,००० रुपये किमतीचे तीन चांदीचे मुकुट चोरून नेले.५० ग्रॅम वजनाचा मुकुट (किंमत ₹१०,०००) ३० ग्रॅम वजनाचा मुकुट (किंमत ₹६,०००),१५ ग्रॅम वजनाचा मुकुट (किंमत ₹३,०००) या घटनेची गांभीर्याने दखल घेत माळशिरस पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३३१(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (सपोनि) पवार करत आहेत. मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी झालेल्या या चोरीमुळे गारवाड आणि माळशिरस परिसरातील नागरिकांमध्ये कमालीची नाराजी आणि संतापाचे वातावरण आहे. चोरांचा लवकरात लवकर छडा लावावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Previous Post

गिरवीचे तुकाराम गोफणे यांना “गुणवंत शिक्षक पुरस्कार” प्रदान

Next Post

माणुसकीचे दर्शन: माजी आमदार रामभाऊ सातपुते ठरले ‘आरोग्यदूत’;

Next Post
माणुसकीचे दर्शन: माजी आमदार रामभाऊ सातपुते ठरले ‘आरोग्यदूत’;

माणुसकीचे दर्शन: माजी आमदार रामभाऊ सातपुते ठरले 'आरोग्यदूत';

ताज्या बातम्या

आषाढी वारीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी १५० कोटींचा खर्च

आषाढी वारीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी १५० कोटींचा खर्च

July 27, 2026
जनकल्याण वाणी अमृत प्रवचनमालेत ‘भक्ती की शक्ती’ विषयावर आचार्य श्री सुविधी सागर महाराजांचे मार्गदर्शन; दर रविवारी सकाळी ८ वाजता प्रवचन

जनकल्याण वाणी अमृत प्रवचनमालेत ‘भक्ती की शक्ती’ विषयावर आचार्य श्री सुविधी सागर महाराजांचे मार्गदर्शन; दर रविवारी सकाळी ८ वाजता प्रवचन

July 27, 2026
आषाढी वारीच्या प्रेरणेतून ५१ कि.मी. धाव; गणेश शिंदे यांचा निरोगी जीवनशैलीचा समाजाला संदेश

आषाढी वारीच्या प्रेरणेतून ५१ कि.मी. धाव; गणेश शिंदे यांचा निरोगी जीवनशैलीचा समाजाला संदेश

July 26, 2026
रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भक्तिमय वातावरणात ‘बालदिंडी सोहळा’ उत्साहात संपन्न!

रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भक्तिमय वातावरणात ‘बालदिंडी सोहळा’ उत्साहात संपन्न!

July 25, 2026
वेळापूरजवळ अपघात ; सात वारकरी जखमी

वेळापूरजवळ अपघात ; सात वारकरी जखमी

July 22, 2026
Malshiraslive

© 2024 Malshiras Live - Design By Umesh Tonpe 8007773888.

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • माळशिरस शहर
  • सोलापुर जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • राजकारण
    • शेती – शेतकरी

© 2024 Malshiras Live - Design By Umesh Tonpe 8007773888.

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group