• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, September 10, 2026
Malshiraslive
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • माळशिरस शहर
  • सोलापुर जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • राजकारण
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • माळशिरस शहर
  • सोलापुर जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • राजकारण
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Malshiraslive
No Result
View All Result

जनकल्याण वाणी अमृत प्रवचनमालेत ‘भक्ती की शक्ती’ विषयावर आचार्य श्री सुविधी सागर महाराजांचे मार्गदर्शन; दर रविवारी सकाळी ८ वाजता प्रवचन

Admin Admin by Admin Admin
July 27, 2026
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
जनकल्याण वाणी अमृत प्रवचनमालेत ‘भक्ती की शक्ती’ विषयावर आचार्य श्री सुविधी सागर महाराजांचे मार्गदर्शन; दर रविवारी सकाळी ८ वाजता प्रवचन
0
SHARES
53
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

माळशिरस लाईव्ह | राजवैभव सांस्कृतिक भवन नातेपुते येथे तपस्वी सम्राट १०८ सन्मती सागरजी महाराज यांचे सुयोग्य शिष्य, परम पूज्य आचार्य श्री १०८ सुविधी सागरजी महाराज यांच्या पावन प्रेरणेने आयोजित ‘जनकल्याण वाणी अमृत प्रवचनमाला’ उत्साहात सुरू असून, यामध्ये ‘भक्ती की शक्ती’ या विषयावर अत्यंत प्रभावी मार्गदर्शन करण्यात आले.

प्रवचनात आचार्य श्री यांनी सांगितले की, भक्ती ही केवळ पूजा-अर्चा किंवा कर्मकांड नसून ती पूर्ण समर्पणाची भावना आहे. मनातील अहंकार, स्वार्थ आणि संशय दूर करून ईश्वराच्या चरणी स्वतःला अर्पण केल्यावरच खरी भक्ती जन्माला येते.

यावेळी रामकथेतील माता शबरी आणि भक्त शिरोमणी हनुमान यांच्या जीवनातील प्रसंगांद्वारे भक्तीचे सामर्थ्य स्पष्ट करण्यात आले. शबरीच्या निश्छळ प्रेमामुळे प्रभू श्रीराम तिच्या झोपडीत आले, तर श्रीराम नामाच्या बळावर हनुमानांनी अशक्य वाटणारी कार्ये यशस्वी केली. जिथे मानवी शक्ती कमी पडते, तिथे भक्ती विजय मिळवून देते, असा संदेश यावेळी देण्यात आला.

आजच्या धावपळीच्या जीवनात मानसिक शांती, संकटांवर मात करण्याची ताकद आणि दया, क्षमा, नम्रता, प्रेम यांसारख्या सद्गुणांचा विकास भक्तीमुळेच होतो. प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनातून काही वेळ नामस्मरणासाठी द्यावा, असे आवाहन आचार्य श्री यांनी केले.

राजवैभव सांस्कृतिक भवन नातेपुते येथे दर रविवारी सकाळी ठीक ८.०० वाजता जनकल्याण वाणी अमृत प्रवचनमालेचे आयोजन करण्यात येत असून, तपस्वी सम्राट १०८ सन्मती सागरजी महाराज यांचे शिष्य आचार्य श्री १०८ सुविधी सागरजी महाराज यांच्या ज्ञानमयी प्रवचनांचा लाभ घेण्यासाठी सर्व धर्मप्रेमी नागरिक, सकल जैन समाज तसेच समस्त ग्रामस्थांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

आषाढी वारीच्या प्रेरणेतून ५१ कि.मी. धाव; गणेश शिंदे यांचा निरोगी जीवनशैलीचा समाजाला संदेश

Next Post

आषाढी वारीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी १५० कोटींचा खर्च

Next Post
आषाढी वारीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी १५० कोटींचा खर्च

आषाढी वारीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी १५० कोटींचा खर्च

ताज्या बातम्या

मोटेवाडी येथे शेळी-मेंढी पालन प्रशिक्षण वर्ग उत्साहात संपन्न

मोटेवाडी येथे शेळी-मेंढी पालन प्रशिक्षण वर्ग उत्साहात संपन्न

August 30, 2026
माळशिरसमध्ये भावूक रक्षाबंधन; शोभा वाघमोडे यांच्या पुढाकाराने पोलीस अन् कैद्यांचे डोळे पाणावले

माळशिरसमध्ये भावूक रक्षाबंधन; शोभा वाघमोडे यांच्या पुढाकाराने पोलीस अन् कैद्यांचे डोळे पाणावले

August 30, 2026
ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरेचा वारसा: नातेपुतेचे प्रसिद्ध श्री गिरिजापती महादेव मंदिर

ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरेचा वारसा: नातेपुतेचे प्रसिद्ध श्री गिरिजापती महादेव मंदिर

August 30, 2026
आठ हजाराची लाच स्विकारताना पोलीस ए.सी.बी.च्या जाळ्यात 

अकलूज प्रकरणात ५.५ लाखांची लाच घेताना दोघे जाळ्यात; दोन पोलीस हवालदारांवर गुन्हा दाखल

August 29, 2026
आषाढी वारीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी १५० कोटींचा खर्च

आषाढी वारीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी १५० कोटींचा खर्च

July 27, 2026
Malshiraslive

© 2024 Malshiras Live - Design By Umesh Tonpe 8007773888.

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • माळशिरस शहर
  • सोलापुर जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • राजकारण
    • शेती – शेतकरी

© 2024 Malshiras Live - Design By Umesh Tonpe 8007773888.

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group