माळशिरस लाईव्ह – रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये दिनांक १५ जुलै २०२६ रोजी अनंतलाल (दादा) रतनचंद दोशी यांचा ७६ वा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यालयात भव्य रक्तदान शिबिर आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा
या भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन अकलूजचे सुप्रसिद्ध डॉक्टर एम. के. इनामदार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. वाढत्या वयासोबत सामाजिक भान जपत राबवलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक झाले. यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. ज्ञानदीप शिक्षण संस्था नातेपुतेचे संस्थापक एम. डी. ढोबळे सर यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाला.
दादा म्हणजे शिस्त, दूरदृष्टी आणि माणुसकीचे मूर्तीमंत रूप
याप्रसंगी रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रमोद दोशी यांनी दादांना ७६ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.भावना व्यक्त करताना ते म्हणाले,”दादांसारखे वडील मिळणे हे आमचे खूप मोठे भाग्य आहे. ते अत्यंत शिस्तप्रिय आणि दूरदृष्टी असणारे व्यक्तिमत्त्व आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची वाटचाल सुरू आहे.”विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. देसाई मॅडम यांनी शुभेच्छा देताना दादांच्या कार्याचा गौरव केला.त्या म्हणाल्या,”जनसामान्यांच्या मनावर प्रेमाने राज्य करणारे, प्रत्येकाच्या सुख दुःखात आपुलकीने सहभागी होणारे आणि माणुसकीचा खरा धर्म जपणारे दादा म्हणजे हजारो कुटुंबांचा विश्वास आहेत. दोशी कुटुंबाने जपलेले संस्कार, प्रेम आणि माणुसकीचे ते मूर्तीमंत रूप आहेत.”
लहानपणीच्या आठवणींना उजाळा
दादांचे मित्र व रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे संचालक रामदास भाऊ कर्णे यांनी दादांना शुभेच्छा देत, त्यांच्यासोबतच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला व जुन्या आठवणींना उजाळा देत वातावरण भावनिक केले. तसेच ज्ञानदीप शिक्षण संस्था नातेपुतेचे संस्थापक सी. डी. ढोबळे सर यांनीही दादांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमास पंचक्रोशीतील अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून दादांना शुभेच्छा दिल्या.यामध्ये रामदास कर्णे (संचालक, रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी),बबन गोफणे, प्रवीण वाघमोडे (पंचायत समिती सदस्य),तुकाराम भाऊ देशमुख (माजी पंचायत समिती सदस्य),सचिन आप्पा वावरे (माजी नगराध्यक्ष)संजय तरडे, भारत सरगर, दिलीप देवकाते, दत्ता भोसले, अजय गांधी, अभिजित दोशी, श्री. चंद्रकांत तोरणे, सुरेश धाईंजे आणि सर्व कमिटी मेंबर्स उपस्थित होते.हा सोहळा यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले






