माळशिरस लाईव्ह – रक्षाबंधनाचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माळशिरस येथील व्यापारी व पत्रकार शोभा तानाजी वाघमोडे कुटुंबाने एक अनोखा आदर्श घालून दिला आहे. संपूर्ण कुटुंबाने अहोरात्र कष्ट करून आपल्या लाडक्या सैनिकांसाठी तब्बल ६,००० आकर्षक राख्या स्वतःच्या हाताने तयार केल्या आहेत.
या राख्या सीमाभागात तैनात असलेल्या जवानां पर्यंत पोहोचवण्यासाठी दि. १५ जुलै रोजी माळशिरस पंचायत समिती येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे माजी मंत्री व आमदार सदाभाऊ खोत आणि डीवायएसपी प्रदीप गोरड यांच्या हस्ते या राख्या मार्गस्थ करण्यात आल्या.या प्रसंगी माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरेश तोरसे, जिल्हा नियोजन समिती सदस्य पांडुरंग वाघमोडे, पंचायत सदस्य आनंद शेंडगे,महादेव साबळे,माजी सैनिक संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष सुरेश तोरसे,सुभेदार मेजर राजू खराडे वेळापूर, ऑनररी नायब सुभेदार राजू पाटील नातेपुते, सुभेदार मोरे महाराज नातेपुते,मारुती वाघमोडे, हरिश्चंद्र साळुंखे, वीर पत्नी, सिंधू ढोबळे वीर पत्नी शोभा सावंत, नगरसेविका रेश्मा टेळे, नगरसेविका पुष्पाताई कोळेकर,विष्णू गोरड, शिवाजी गोरड विकास कोळेकर,बापू वाघमोडे,वंदना कोळेकर,अहिल्या वाघमोडे,राणी साठे,पूजा ढावरे, फार्मासिस्ट मकरंद कुदळे ,नितीन गायकवाड, सचिन गाडेकर,जगदीश राजमाने, पत्रकार भारत मगर, एल डी वाघमोडे, निनाद पाटील, लक्ष्मण कुरुडकर, स्वप्निल राऊत संजय हुलगे यांच्यासह तालुक्यातील आजी-माजी सैनिक उपस्थित होते.
वैशिष्ट्ये आणि भावना:
- पूर्णपणे स्वदेशी: राख्या बनवण्यासाठी तिरंगी सुती दोरे, मणी आणि कुंदन या पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्यात आला आहे.
- कृतज्ञता पत्र: प्रत्येक राखीसोबत सैनिकांचे आभार मानणारे व त्यांना शुभेच्छा देणारे एक भावनिक पत्र जोडण्यात आले आहे.
“आपण घरात सुरक्षितपणे सण साजरे करतो कारण सैनिक सीमेवर पहारा देत असतात. त्यांना घरच्यांची कमतरता भासू नये, याच पवित्र भावनेतून आम्ही या राख्या बनवल्या आहेत.” सौ.शोभा तानाजी वाघमोडे






